अभिनेता राजपाल यादवची राजकारणात एंट्री

बॉलीवूडमधील विनोदी अभिनेता राजपाल यादव आता राजकारणात एंट्री घेतोय. सर्व संभव पार्टी(एसएसपी) या नावाचा त्याने पक्ष स्थापन केलाय. उत्तर प्रदेश निवडणुकीतील सर्व जागांवर लढण्याची घोषणा राजपाल यादवने केलीये. 

Updated: Oct 28, 2016, 11:41 AM IST
अभिनेता राजपाल यादवची राजकारणात एंट्री title=

मुंबई : बॉलीवूडमधील विनोदी अभिनेता राजपाल यादव आता राजकारणात एंट्री घेतोय. सर्व संभव पार्टी(एसएसपी) या नावाचा त्याने पक्ष स्थापन केलाय. उत्तर प्रदेश निवडणुकीतील सर्व जागांवर लढण्याची घोषणा राजपाल यादवने केलीये. 

मी वादांचे नव्हे तर संवादाचे राजकारण करण्यासाठी आलोय.आम्ही निवडणूक लढवू मात्र वेगळ्या पद्धतीने.  राजकारण कसे असते हे आम्ही समाजाला दाखवून देऊ. पक्षाचे अध्यक्ष राजपालचा मोठा भाऊ श्रीपाल यादव असतील, असे राजपाल म्हणाला. गुरुवारी लखनऊमध्ये या पक्षाची घोषणा करण्यात आली.

मला लोकांची सेवा करायची आहे. समाजाचा विकासासाठी माझा पक्ष नेहमी कटिबद्ध असेल. आंदोलनाची फॅशन करुन सत्ता मिळवण्याची आमची जात नाही. विकास करण्याकडे आमचा भर असेल. मेट्रो येण्याआधी ऊस शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे हे महत्त्वाचे ध्येय असेल, असेही पुढे राजपाल म्हणाला.