अभिनेत्री प्रिती झिंटानं फेसबुकवर पुन्हा मांडली बाजू

 अभिनेत्री प्रिती झिंटानं पुन्हा एकदा आपली बाजू फेसबुकवर मांडली आहे. आयपीएल व्यवहारापोटी मी नेस वाडियाला 5 कोटी रुपये दिले, अशी माहिती देताना अंडरवर्ल्ड डॉनच्या धमकीचं प्रकरण आश्चर्यकारक आहे, असं प्रितीने म्हटलंय.

Updated: Jul 2, 2014, 03:15 PM IST
अभिनेत्री प्रिती झिंटानं फेसबुकवर पुन्हा मांडली बाजू  title=

मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटानं पुन्हा एकदा आपली बाजू फेसबुकवर मांडली आहे. आयपीएल व्यवहारापोटी मी नेस वाडियाला 5 कोटी रुपये दिले, अशी माहिती देताना अंडरवर्ल्ड डॉनच्या धमकीचं प्रकरण आश्चर्यकारक आहे, असं प्रितीने म्हटलंय.

प्रितीने उद्योगपती नेस वाडीया यांच्याविरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केलीये. आयपीएल मॅच दरम्यान ३० मे रोजी ही घटना घडली होती. वानखेडे स्टेडीयमच्य गरवारे पॅव्हेलियमध्ये हा प्रकार घडल्याची तक्रार आहे. पोलिसांनी नेस वाडीया यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

प्रिती झिंटाने नेस वाडीया विरुध्द विनयभंगाची तक्रार मरिन ड्राइव्ह पोलीस स्थानकात नोंदवली. नेस वाडीया हा प्रसिध्द उद्योगपती असून, तो आणि प्रिती आयपीएलमधील पंजाब इलेव्हन टीमचे एकत्रितपणे मालकदेखील आहेत. दरम्यान, नेसच्या वडिलांना अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. याबाबत प्रितीने कानावर हात ठेवले आहे. अंडरवर्ल्ड डॉनच्या धमकीचं प्रकरण आश्चर्यकारक आहे, असं प्रितीने फेसबुकवर म्हटलंय.

काय म्हटलंय फेसबुकवर Post by Real Preity Zinta -  इथं क्लिक करा

- 'आयपीएल व्यवहारात मी स्वत: ५ कोटी रुपये दिले'

- 'नेस वाडियाच्या हिस्स्याचे ५ कोटी मीच दिले'

- 'कालांतराने नेसने व्याज न देता मला ५ कोटी परत केले'

- 'स्टेडियममधील माझ्या सिट्स खेळाडूंच्या कुटुंबियांसाठी दिल्या'

- 'अंडरवर्ल्ड डॉनच्या धमकीचं प्रकरण आश्चर्यकारक आहे.'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.