अजय-अतुल यांचे देशप्रेम

'निळकंठ मास्तर' या आगामी मराठी चित्रपटात अजय-अतुल संगीत देणार आहे. हा चित्रपट देशप्रेमावर आधारित असून, त्या प्रकारचं संगीत देण्याचे कार्य अजय-अतुल या जोडगोळीने आपल्या खांद्यावर घेतले आहे.

Updated: Jul 29, 2015, 12:56 PM IST
अजय-अतुल यांचे देशप्रेम title=

मुंबई : 'निळकंठ मास्तर' या आगामी मराठी चित्रपटात अजय-अतुल संगीत देणार आहे. हा चित्रपट देशप्रेमावर आधारित असून, त्या प्रकारचं संगीत देण्याचे कार्य अजय-अतुल या जोडगोळीने आपल्या खांद्यावर घेतले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे असून गीत रचनाही त्यांनीचं केली आहे. देशभक्तांच्या मनात रुजलेल्या प्रेमभावनेवर भाष्य करणारा या चित्रपटात हिंदीतील काही गायकांनीही गाणी गायली आहे.

देशप्रेमावरील 'वंदे मातरम' या गाण्याला सुमारे अठरा गायकांनी आपला आवाज दिला आहे. चित्रपटात पाच गाणी असून यातील 'परतुनी ये ना' हे गाणे हिंदीतील दिग्गज गायक जावेद अली आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे.

या गायकांबरोबर मराठीतील आनंदी जोशी, अजय गोगावले आणि आदित्य मोडक यानींही या चित्रपटात गाणी गायली आहेत. अक्षर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत निळकंठ मास्तर या चित्रपटाची निर्मिती मेघमाला पठारे यांनी केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.