'सैराट'चा हिरो परश्या आणि आर्चीचा डान्स जलवा पाहा

  'सैराट'या सिनेमाची टीम झी टॉकीजच्या या कार्यक्रमात दिसणार आहे. मुख्य म्हणजे परश्या आणि आर्ची यांचा डान्स जलवा पाहायला मिळणार आहे.

Updated: May 6, 2016, 03:31 PM IST
'सैराट'चा हिरो परश्या आणि आर्चीचा डान्स जलवा पाहा title=

मुंबई : हिंदी सिनेमांचे जोरदार प्रमोशन करण्यात येते. मात्र, मराठी सिनेमांचे करण्यात येत नाही. यासाठी झी टॉकीजने पुढाकार घेतलाय. ‘बिग तिकीट’ शोच्या माध्यमातून हा प्रयोग करण्यात येत आहे. यात सध्या चर्चेत असणाऱ्या 'सैराट'या सिनेमाची टीम झी टॉकीजच्या या कार्यक्रमात दिसणार आहे. मुख्य म्हणजे परश्या आणि आर्ची यांचा डान्स जलवा पाहायला मिळणार आहे. ( व्हीडिओ बातमीच्या मध्ये पाहा)

चांगल्या आशयासोबत चित्रपटांचं प्रमोशनही दणक्यात झालं तर प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचतो. सध्याच्या घडीला छोटा पडदा हे प्रसिद्धीचं प्रभावी माध्यम ठरू लागल्याने छोट्या पडद्यावर चित्रपटांचं प्रमोशन जोरदार होऊ लागलं आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांनी रसिकांची मने जिंकणारं ‘झी टॉकीज’ मनोरंजनाच्या कक्षा रूंदावणाऱ्या अनेक योजना आखत असते. मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत ‘झी टॉकीज’ने आगळा प्रयोग केला आहे.

आगामी मराठी चित्रपटांच्या प्रमोशनचा ‘टॉकीज बिग तिकीट’ हा कार्यक्रम नुकताच मुंबईत झाला. मनोरंजनाच्या क्षेत्रात हा प्रयोग वेगळा आहे. ‘टॉकीज बिग तिकीट’ या कार्यक्रमांतर्गत ‘मधु इथे अन् चंद्र तिथे’, ‘सैराट’, ‘पिंडदान’, ‘३५ टक्के काठावर पास’, ‘लाल इश्क’ या आगामी मराठी चित्रपटांचं प्रमोशन या कार्यक्रमात करण्यात आलं. 

चित्रपटातील गीतांवर परर्फोमन्स व स्कीट सादर करीत आगामी चित्रपटांची छोटेखानी झलकच यावेळी सादर करण्यात आली. ‘सैराट’च्या आर्ची-परश्याने सादर केलेला नृत्याचा नजराणा चांगलाच रंगला.  अजय-अतुल यांनी सैराटच्या गाण्यांबद्दलचे अनुभव तुम्हाला झी टॉकीजवर पाहायला मिळणार आहे.

मनोरंजनाची मेजवानी असणारा ‘टॉकीज बिग तिकीट’ हा कार्यक्रम ८ मे ला दुपारी १२.०० वा. व सायं ७.०० वा. ‘झी टॉकीज’वर प्रदर्शित होणार आहे.