बॉलिवूडचा खिलाडी करणार 'बिग बॉस-8' चं होस्टिंग?

Updated: Jul 19, 2014, 09:19 PM IST
बॉलिवूडचा खिलाडी करणार 'बिग बॉस-8' चं होस्टिंग? title=

मुंबईः बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखळा जाणारा अभिनेता अक्षय कुमार हा ‘बिग बॉस - सिझन 8’ होस्ट करू शकतो, अशी माहिती मिळतेय.

कलर्स चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या ‘बिग बॉस सीजन-7’ काही महिण्यांपूर्वीच संपलंय. हे सिझन अभिनेता आणि बॉलिवूडचा दबंग खान - सलमान खाननं होस्ट केलं होतं. याआधीही सलमान खाननं या शोच होस्टिंग केलं होतं.

सीझन-7 दरम्यान, सलमाननं कार्यक्रमादरम्यान ‘पुढचा सीझन मी होस्ट करणार नाही’ असंही म्हटलं होतं. तसंच, काही दिवसांपूर्वीच ‘शाहरुख खान बिग बॉसचं चांगलं होस्टिंग करू शकतो’ असंही त्यानं बोलून दाखवलंय.  

'बिग बॉस' या कार्यक्रमाचे निर्माते आठव्या सीझनसाठी सलमान खानलाच मनधरणी करत आहेत. पण, सलमान मात्र यासाठी फारसा उत्सुक नाही, तो आपल्या म्हणण्यावर ठाम आहे.  

त्यामुळे, या कार्यक्रमाच्या आठव्या सीझनसाठी अक्षय कुमार सोबत चॅनलनं बोलणी सुरु केल्याचंही समजतंय. सगळं व्यवस्थित पार पडलं तर अक्षय कुमार 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वात आपल्याला होस्ट म्हणून पाहायला मिळू शकेल. अक्षयने यापूर्वी 'खतरों के खिलाड़ी' या रियलिटी शोचं होस्टिंगही केलंय. 

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, 'बिग बॉस' या कार्यक्रमाचे आत्तापर्यंत सात पर्व संपलेत आणि आत्तापर्यंत अमिताभ बच्चन, सलमान खान, संजय दत्त, शिल्पा शेट्टी आणि अर्शद वारसी यांनी शोचं होस्टिंग केलंय.  
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.