व्हिडिओ : 'ऑल इज वेल'चा ट्रेलर

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री आसिन यांचा आगामी 'ऑल इज वेल' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Jul 2, 2015, 01:56 PM IST
व्हिडिओ : 'ऑल इज वेल'चा ट्रेलर title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री आसिन यांचा आगामी 'ऑल इज वेल' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

या सिनेमात ऋषी कपूर आणि सुप्रिया पाठक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ऋषी कपूर आणि अभिषेक बच्चन याआधी 'दिल्ली ६' या सिनेमात एकत्र दिसले होते.

'ऑल इज वेल' या सिनेमातून अभिनेत्री आसिन दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतेय. आसिन यापूर्वी 'खिलाडी ७८६' या सिनेमात दिसली होती. 

या सिनेमात सोनाक्षी सिन्हाचं एक आयटम साँगही दिसणार आहे. हा सिनेमा २१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय उमेश शुक्ला यानं.... 

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.