भूकंपामुळे अमिताभ यांचा पलंग हलू लागला

आपल्या आगामी टीनच्या (टीई3एन) शूटिंग करत असेलल्या बिग बी अमिताभ बच्चन यांनाही भूकंपाचा हादरा जाणवला. 

Updated: Jan 4, 2016, 03:51 PM IST
भूकंपामुळे अमिताभ यांचा पलंग हलू लागला title=

कोलकाता : आपल्या आगामी टीनच्या (टीई3एन) शूटिंग करत असेलल्या बिग बी अमिताभ बच्चन यांनाही भूकंपाचा हादरा जाणवला. 

देशाच्या ईशान्य भागात आज सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपामुळे अनेक इमारत्यांचे नुकसान झाले. बिग बींनाही त्यांच्या खोलीत भूकंपाचा धक्का जाणवला. ट्विटरवरुन त्यांनी याची माहिती दिली. 

भूकंप! सकाळी साडेचारच्या सुमारास हादरे जाणवले. बेड हलू लागला. मी विचारात पडलो. आज सकाळी याबाबत माहिती मिळाली. सर्व सुरक्षित असून ही प्रार्थना असं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय.

सुजॉय घोष निर्मित टीन या चित्रपटाचं सध्या शूटिंग सुरु आहे. या चित्रपटात विद्या बालन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचीही भूमिका पाहायला मिळणार आहे.