बिग बींनी जाहीर केलं चित्रपटाचं नाव

बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे.

Updated: Mar 13, 2016, 04:25 PM IST
बिग बींनी जाहीर केलं चित्रपटाचं नाव title=

मुंबई: बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. पिंक हे या चित्रपटाचं नाव आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली. याबरोबच या चित्रपटातले त्यांचा लूकही बिग बींनी ट्विट केले आहेत. 

शूजीत सरकार यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं सध्या दिल्लीमध्ये शूटिंग सुरु आहे. या चित्रपटाचं नाव इव्ह असेल असं बोललं जात होतं, पण याआधीच या चित्रपटाचं नाव इव्ह नसेल असं अमिताभ यांनी स्पष्ट केलं होतं. राष्ट्रीय पुरस्कार विजेते बंगालचे दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.