जुने दिवस आठवून अमिताभ झाले भावूक

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे आपले जुने दिवस आठवून भावूक झाले आहेत. कधी आपल्या कुटुंबियांसोबत किंवा कधी आपल्या मित्रांसोबतचे फोटो अमिताभ `फेसबूक`वर शेअर करत आहेत.

Updated: May 2, 2014, 04:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे आपले जुने दिवस आठवून भावूक झाले आहेत. कधी आपल्या कुटुंबियांसोबत किंवा कधी आपल्या मित्रांसोबतचे फोटो अमिताभ `फेसबूक`वर शेअर करत आहेत.
अमिताभ यांनी फेसबूकवर आपला एक फोटो शेअर करताना लिहलं की, `हा फोटो `प्रतीक्षा` म्हणजेच मुंबईतील अमिताभ यांच्या घरातील आहे. जेव्हा `कूली` सिनेमाच शुटींग सुरू होतं. त्यावेळी मी आजारी पडलो. जेव्हा मी हॉस्पिटल मधून घरी आलो, तेव्हा फोटोमध्ये हार घालून दिसणारी ही व्यक्ती मला भेटायला घरी आली. या माणसाने माझ्या आजारपणात देवाकडे प्रार्थना केली होती की, मी जर वाचलो, तर हा माणूस बडोद्यावरून धावत मला भेटायला येईल आणि धावत परत बडोद्याला जाईल.
बिग बी म्हणतात, या माणसाने तसंच केलं. हा माणूस बडोद्यावरून मुंबईत ८०० किलोमीटर धावत आला आणि पुन्हा धावत बडोद्याला गेला. मी खरंच या सगळ्या लोकांचे आभार मानतो. ज्या लोकांनी माझ्या चांगल्या आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना केली.
या शिवाय अमिताभ यांनी `शक्ती` सिनेमाच्या मुहूर्ताचा फोटो देखील शेअर केला. या फोटोत दिलीप कुमार, सलीम खान आणि स्वत: अमिताभ दिसत आहेत. हा फोटो `हॉलिडे इन` या हॉटेलमध्ये काढण्यात आला होता. अमिताभ यांनी दिलीप कुमार यांना आपले आदर्श व्यक्ती म्हणून सांगीतले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.