विराटसाठी सुल्तानचे खास स्क्रीनिंग

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली यांचे प्रेमप्रकरण सर्वश्रृत आहे. मध्यंतरी दोघांच्या ब्रेकअपचीही चर्चा होती. पण अनेकवेळा दोघेही पुन्हा एकत्र दिसून आल्याने ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. 

Updated: Jun 24, 2016, 09:00 AM IST
विराटसाठी सुल्तानचे खास स्क्रीनिंग title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली यांचे प्रेमप्रकरण सर्वश्रृत आहे. मध्यंतरी दोघांच्या ब्रेकअपचीही चर्चा होती. पण अनेकवेळा दोघेही पुन्हा एकत्र दिसून आल्याने ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. 

आता अनुष्काने विराटसाठी आपल्या ‘सुलतान’ या आगामी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले आहे. विराटसाठी ४ ते ५ जुलैला हे स्पेशल स्क्रिनिंग होणार असल्याची चर्चा आहे. 

'सुलतान’ चित्रपटात अनुष्का कुस्तीपटूच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी तिने खूप मेहनत घेतली असल्याने आपल्या भूमिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासाठी अनुष्का खूप उत्सुक आहे.