अनुष्काला व्हायचंय सुपरवुमन!

सुल्तान सिनेमात आपल्या अदाकारीने अनुष्का शर्माने सगळ्यांची मनं जिंकली होती. आता अनुष्काला पुन्हा एकदा नवा प्रयोग करण्याची इच्छा आहे. अनुष्काला आता सुपरवुमन होण्याची इच्छा आहे.

Updated: Jan 19, 2017, 08:34 PM IST
अनुष्काला व्हायचंय सुपरवुमन! title=

मुंबई : सुल्तान सिनेमात आपल्या अदाकारीने अनुष्का शर्माने सगळ्यांची मनं जिंकली होती. आता अनुष्काला पुन्हा एकदा नवा प्रयोग करण्याची इच्छा आहे. अनुष्काला आता सुपरवुमन होण्याची इच्छा आहे.

अनुष्का शर्मा प्रत्येक सिनेमात आपल्याला वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. आता या बॉलिवूडच्या ग्लॅमडॉलला फिमेल सुपरहिरो बनण्याची इच्छा आहे. 

'मला सुपरवुमन बनण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर मला जबरदस्त अॅक्शन सिनेमेही करायचे आहेत, असं नुकतचं एका कार्यक्रमा दरम्यान अनुष्कानं म्हटलंय. 

अनुष्काला हृतिकच्या अपोझिट क्रिश-4ची ऑफर मिळाली असल्याची चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये रंगतेय. मात्र अनुष्काने या सगळ्या अफवा असल्याचं सांगत या वृत्ताचं खंडन केलं आहे.

अनुष्का सध्या आपल्या होम प्रॉडक्शनच्या 'फिल्लौरी' या सिनेमात बिझी आहे. या सिनेमात अनुष्काबरोबर दलजीत दोसांझही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता अनुष्का फिमेल सुपरवुमेनच्या भूमिकेत आपल्याला दिसते का? हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.