मॅगझीनसाठी अनुष्का शर्माचं हॉट फोटोशूट

क्रिकेटर विराट कोहलीला आपल्या अदाकारीने घायाळ करणारी अनुष्का आता चक्क सगळ्यांनाच घायाळ करणार असंच दिसतंय.

Updated: Dec 17, 2014, 10:26 AM IST
 मॅगझीनसाठी अनुष्का शर्माचं हॉट फोटोशूट title=

नवी दिल्ली : क्रिकेटर विराट कोहलीला आपल्या अदाकारीने घायाळ करणारी अनुष्का आता चक्क सगळ्यांनाच घायाळ करणार असंच दिसतंय.

आत्तापर्यंत सोज्वळ किंवा 'गर्ल टू नेक्स्ट डोअर' भूमिकांमधून दिसलेली अनुष्का पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अंदाजात दिसतेय. नुकतंच, अनुष्कानं 'जी क्यू मॅगझीन'साठी एक हॉट फोटोशूट केलंय.

'जी क्यू मॅगझीन'च्या डिसेंबरच्या अंकासाठी अनुष्काने हे फोटोशूट दिलंय.  बॉलीवूडमध्ये अनुष्का नेहमीच वेगवेगळे रोल करण्यासाठी पुढे असते. तिच्या आगामी 'पीके' या चित्रपटातही ती एका वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहे. अनुष्काचा आमिर खानसोबत हा सिनेमा येत्या १९ तारखेला प्रदर्शित होतोय. या चित्रपटात अनुष्का पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.