मणिरत्नमच्या आगामी सिनेमात गाणं गाणार अमीन रेहमान

ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए. आर. रेहमानचा १२ वर्षाचा मुलगा अमीन हा दिग्दर्शक मणिरत्नमच्या आगामी सिनेमात गाणं गाणार आहे. या आधी त्यांनी ‘कपल्स रीट्रीट’ सिनेमात ‘नाना’ हे गाणं गायलं आहे.

Updated: Sep 28, 2014, 03:30 PM IST
मणिरत्नमच्या आगामी सिनेमात गाणं गाणार अमीन रेहमान title=

चेन्नई : ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए. आर. रेहमानचा १२ वर्षाचा मुलगा अमीन हा दिग्दर्शक मणिरत्नमच्या आगामी सिनेमात गाणं गाणार आहे. या आधी त्यांनी ‘कपल्स रीट्रीट’ सिनेमात ‘नाना’ हे गाणं गायलं आहे.

“अमीनला अनेक दिग्दर्शक त्यांच्या सिनेमात घेण्यासाठी इच्छुक आहेत. पण, माझी इच्छा आहे. की, त्यानं सध्या तरी त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं”, असं ए.आर. रेहमानचं म्हणणं आहे.

तमिळ समाचार चॅनलवर २ ऑक्टोबरला रेहमानचा कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमात तब्बल ५०पेक्षा जास्त तमीळ गीतांचं सादरीकरण होईल. या कार्यक्रमासाठी रेहमान मागील दोन महिन्यापासून तयारी करत आहे.

या कार्यक्रमात रेहमानच्या संगीत शाळा ‘केएम कंसर्वेटरी’चे विद्यार्थीं, ‘ब्लाजे’ आणि ‘कार्तीक’ यासारख्या गायकांचा समावेश असणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.