'बाहुबली'चं वेड... सिनेमासाठी चार्टर प्लेनमधून ४० बांग्लादेशी फॅन भारतात!

प्रेक्षकांना प्रदीर्घ काळ वाट पाहायला लावल्यानंतर 'बाहुबली २ : द कन्क्लुजन' अखेर २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला... आणि तब्बल दोन वर्षानंतर 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं?' या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं. 

Updated: May 3, 2017, 12:06 PM IST
'बाहुबली'चं वेड... सिनेमासाठी चार्टर प्लेनमधून ४० बांग्लादेशी फॅन भारतात! title=

नवी दिल्ली : प्रेक्षकांना प्रदीर्घ काळ वाट पाहायला लावल्यानंतर 'बाहुबली २ : द कन्क्लुजन' अखेर २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला... आणि तब्बल दोन वर्षानंतर 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं?' या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं. 

हा सिनेमा पाहण्यासाठी फॅन्स काय काय करू शकतात? त्याचं एक उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं. इंडिया टुडेनं दिलेल्या बातमीनुसार मंगळवारी 'बाहुबली २' पाहण्यासाठी जवळपास ४० बांग्लादेशी फॅन्स चार्टर प्लेननं प्रवास करत कोलकत्यात दाखल झाले. एखादा सिनेमा पाहण्यासाठी खिशाला दिलेला हा फटका आणि सिनेमाचं वेड दुर्मिळचं म्हणावं लागेल. 

या सिनेमाचं प्रेक्षकांना जणू वेडचं लागलंय... याचा अंदाज बॉक्स ऑफिसचे आकडे समजल्यानंतर तुम्हाला आलाच असेल... या सिनेमानं आत्तापर्यंतचे भारतीय सिनेमाचे जवळपास सगळेच रेकॉर्ड तोडलेत. 

या सिनेमानं चार दिवसांत ६२० करोड रुपयांची कमाई केलीय. हा सिनेमा जगभरात जवळपास ९००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आलाय. तेलगु, तामिळ आणि हिंदी सहीत सहा भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आलीय. सिनेमात प्रभास, राणा दुग्गुबाती, अनुष्का शेट्टी आणि सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.