'बाहुबली2' सिनेमाचा सीन झाला लीक, एकाला अटक

2017मध्ये रिलीज होणारा बहुचर्चित 'बाहुबली : द कन्क्लुजन' या सिनेमाचा एक सीन लीक झालाय. तब्बल 9 मिनिटांचा हा सीन लीक झालाय.

Updated: Nov 23, 2016, 08:43 AM IST
'बाहुबली2' सिनेमाचा सीन झाला लीक, एकाला अटक title=

मुंबई : 2017मध्ये रिलीज होणारा बहुचर्चित 'बाहुबली : द कन्क्लुजन' या सिनेमाचा एक सीन लीक झालाय. तब्बल 9 मिनिटांचा हा सीन लीक झालाय.

सीन लीक झाल्याप्रकरणी विजयवाडा येथून एका ग्राफिक डिझायनरला अटक कऱण्याक आलीये.

हैदराबादमध्ये जुबली हिल्स पोलीस ठाण्यात सिनेमाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला अटक कऱण्यात आलीये. 

या व्यक्तीने सिनेमातील युद्धाच्या फुटेजची चोरी केली. सिनेमाचा क्लायमॅक्स या सीनमध्येच आहे. यानंतर त्या व्यक्तीने हा सीन इंटरनेट टाकत व्हायरल केला असा आरोप त्या व्यक्तीवर करण्यात आलाय.