सोनमआधी दोन अभिनेत्रींनी साकारली होती नीरजाची व्यक्तिरेखा

लहान वयात अशोकचक्र पुरस्कार मिळवणारी नीरजा भानोतच्या जीवनावर आधारित सोनम कपूरचा नीरजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम यश मिळवतोय. 

Updated: Feb 23, 2016, 09:10 AM IST
सोनमआधी दोन अभिनेत्रींनी साकारली होती नीरजाची व्यक्तिरेखा title=

नवी दिल्ली : लहान वयात अशोकचक्र पुरस्कार मिळवणारी नीरजा भानोतच्या जीवनावर आधारित सोनम कपूरचा नीरजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम यश मिळवतोय. 

नीरजाला प्रेक्षकांची चांगली वाहवा मिळतेय. राम माधवानी यांनी नीरजाची स्टोरी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आणली. मात्र तुम्हाला माहीत आहे का नीरजाची व्यक्तिरेखा साकारणारी सोनम कपूर ही पहिलीच अभिनेत्री नाहीये.

याआधी दोन अभिनेत्रींनी नीरजाची व्यक्तिरेखा साकारलीये. काही वर्षांपूर्वी हीरोज या शोमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या एपिसोडमध्ये नीरजाची कहाणी दाखवण्यात आली होती. यात करिश्मा तन्नाने नीरजाची व्यक्तिरेखा साकारली होती. 

त्यानंतर विकास गुप्ताच्या तलाश या टीव्ही सीरियलमध्येही नीरजाच्या शूरतेची कहाणी सांगणारा विशेष एपिसोड दाखवण्यात आला होता. यात नेहा झुल्काने ही भूमिका साकारली होती.