वाढदिवसाला मिळालेलं 'सेक्स गिफ्ट' सर्वात खास!

आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे बऱ्याचदा चर्चेत असलेला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनं पुन्हा एकदा एक बेधडक वक्तव्य करत अनेकांना धक्का दिलाय. 

Updated: Oct 23, 2015, 04:49 PM IST
वाढदिवसाला मिळालेलं  'सेक्स गिफ्ट' सर्वात खास! title=

नवी दिल्ली : आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे बऱ्याचदा चर्चेत असलेला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनं पुन्हा एकदा एक बेधडक वक्तव्य करत अनेकांना धक्का दिलाय. 

एन्टरटेन्मेंट वेबसाईट 'बॉलिवूड लाईफ'ला दिलेल्या मुलाखतीत रणवीरनं आपल्याला यंदा एक बेस्ट बर्थ डे गिफ्ट मिळाल्याचं सांगितलंय... नुकताच रणवीरनं आपला वाढदिवस साजरा केलाय. यावेळी त्याला अनेक गिफ्टही मिळालेत... यामध्ये, एक कार, एक विंटेज वॉर... आणि अशा अनेक वस्तु भेट म्हणून मिळाल्या.

पण, यामध्ये सर्वात खास होतं ते 'सेक्स गिफ्ट'... असं रणवीर म्हणतोय. रणवीर ही मुलाखत देताना त्याच्यासोबत दीपिका पादूकोणही उपस्थित होती. यावेळी, ती खूप शांत दिसली. 

दीपिका आणि रणवीर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. इतकंच काय तर अनेकदा सार्वजनिक ठिकाणी रणवीरनं दीपिकाला प्रपोजही केलंय. या दोघांनी पहिल्यांदा 'रामलीला'मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आता 'बाजीराव मस्तानी' या सिनेमात ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.