'देसी कट्टे'च्या म्यूझिक लॉन्चला गाण्याऐवजी प्ले झाली पॉर्न फिल्म

अॅक्शन फिल्म 'देशी कट्टे'च्या म्यूझिक लॉन्चला असं काही घडलं की इव्हेंटला उपस्थित सर्व लोक हैराण झाले. इव्हेंट दरम्यान स्क्रीनवर चित्रपटाच्या सीन आणि गाणं चालवलं जाणार होतं. अचनाक ब्लू फिल्मची एक क्लिप सुरू झाली. हे काही सेकंदापुरतच घडलं. लगेच ते दुरुस्त करण्यात आलं. पण काही सेंकद का होईना लोकं हैराण झाले. 

Updated: Sep 3, 2014, 03:43 PM IST
'देसी कट्टे'च्या म्यूझिक लॉन्चला गाण्याऐवजी प्ले झाली पॉर्न फिल्म title=

मुंबई: अॅक्शन फिल्म 'देशी कट्टे'च्या म्यूझिक लॉन्चला असं काही घडलं की इव्हेंटला उपस्थित सर्व लोक हैराण झाले. इव्हेंट दरम्यान स्क्रीनवर चित्रपटाच्या सीन आणि गाणं चालवलं जाणार होतं. अचनाक ब्लू फिल्मची एक क्लिप सुरू झाली. हे काही सेकंदापुरतच घडलं. लगेच ते दुरुस्त करण्यात आलं. पण काही सेंकद का होईना लोकं हैराण झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार टेक्निकल टीमच्या एका सदस्याची ही करामत होती. एका इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार 'अचानक दोन गाण्यादरम्यान काही सेकंद अश्लील व्हिडिओ प्ले झाला. त्याला लगेच थांबवलं. मात्र तिथं उपस्थित कलाकार आणि गेस्ट हैराण झाले.'

दिग्दर्शक आणि निर्माता आनंद कुमारचा चित्रपट 'देसी कट्टे'मध्ये सुनील शेट्टी, जय भानुशाली, आशुतोष राणा, टिया वाजपेयी, साशा आगा आणि अखिल कपूर आहेत. या म्यूझिक लॉन्चच्या इव्हेंटला संगीतकार कैलाश खेर सुद्धा उपस्थित होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.