फिल्म रिव्ह्यू : बॉलिवूडचे वॉरियर 'ब्रदर्स'

Updated: Aug 14, 2015, 05:30 PM IST
फिल्म रिव्ह्यू : बॉलिवूडचे वॉरियर 'ब्रदर्स' title=

 

चित्रपट : करण मल्होत्रा
लेखक : सिद्धार्थ - गरिमा
संगीत : अजय - अतुल
कलाकार : अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकलिन फर्नांडिस, जॅकी श्रॉफ

जयंती वाघदरे
प्रतिनिधी, झी २४ तास

मुंबई : आज बिग स्क्रीनवर अक्षय कुमार सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फरनांडस यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ब्रदर्स हा सिनेमा झळकलाय. 'बदर्स' हा सिनेमा खरंतर हॉलिवूडच्या वॉरीयर्स या सिनेमाचा ऑफिशियल रिमेक आहे.

केवळ वॉरियर्सच नाही तर फाइट क्लब आणि रॉकी या हॉलिवूड सिनेमातले अनेक प्रसंग आणि मसाला या सिनेमात उतरवण्यात आलाय.. डेविड आणि मॉन्टी या दोन भावांची ही गोष्ट.. एकाच घरातले हे दोघं काही कारणांनी वेगळे होतात.. फायनली नशीबाचा खेळ असा की एका मार्शियल आर्टे स्पर्धेत हे दोघंही आमने सामने येतात... या फाइटमध्ये सहभागी होण्यामाघे या दोघांचंही एक-एक ध्येय असतं.. एकाला आपल्या आजारी मुलीचे प्राण वाचवायचे असतात तर दुसरा आपल्या वडिलांसाठी आखाड्यात उतरतो.. 

दिग्दर्शक करण मल्होत्रा यांनी या सिनेमाची हाताळणी करताना अनेक ठिकाणी अॅक्शन आणि हिंसेचा ओवरडोस केल्याचं जाणवतं...या सिनेमातला बॅकग्राउंड स्कोरही एका पॉइंटवर खूपच त्रासदायक जाणवतो.

अभिनेता अक्षय कुमारनं नेहमीप्रमाणेच या सिनेमातही छान कामगिरी केली आहे.. सिनेमातला त्याचा लूक, त्याचे अॅक्शन्स, त्याचा अभिनय कमाल झालाय.. दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्रा या नटानंही छान काम केलंय पण त्याच्या वाट्याला अक्षय कुमारच्या तुलनेत फार कमी सीन्स आलेत.

करीना कपूरचं आयटम सॉन्ग 'मेरा नाम मॅरी है' जरी एंटरटेनिंग असलं तरी ते उगागच सिनेमात घुसवण्यात आलंय. हे सगळे फॅक्टर्स पाहता ब्रदर्स या सिनेमाला मी देतेय २.५ स्टार्स...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.