सेक्स रॅकेट : अभिनेत्री श्वेताच्या पाठिशी दीपिका पदुकोण

हैदराबादमध्ये  सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आलेल्या अभिनेत्री श्वेता बसू प्रसादच्या समर्थनात आता बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील सामील झाली आहे. 

Updated: Sep 12, 2014, 08:13 PM IST
सेक्स रॅकेट : अभिनेत्री श्वेताच्या पाठिशी दीपिका पदुकोण title=

मुंबई : हैदराबादमध्ये  सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आलेल्या अभिनेत्री श्वेता बसू प्रसादच्या समर्थनात आता बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील सामील झाली आहे. 

दीपिकापूर्वी अभिनेत्री साक्षी तंवर श्वेताच्या बचावासाठी पुढे आली होती. दीपिकाने म्हटले की, श्वेतासमोर पैस कमवून आपल्या परिवाराला आणि स्वतःला मदत करण्यासाठी इतर कोणताही पर्याय नव्हता तर यात काहीही चुकीचे नाही. 

दीपिकाने सांगितले की, ' हे खूप चुकीचे आहे. आपण तिची मदत का करत नाही आहोत. आपण या प्रकरणाला स्कँडल का बनवत आहोत. आपण त्या लोकांबद्दल का बोलत नाही, ज्यांनी श्वेताकडून हे काम करून घेतले. मला वाटते की आपण सर्वांनी तिला मदत करायला हवी. 

श्वेताला ३१ ऑगस्ट रोजी हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती. श्वेताना खुलासा केला होता की, आर्थिक विवंचनेतून ती या सेक्स रॅकेटचा भाग बनली. श्वेताला ‘मकडी’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यात तिने बाल कलाकाराची भूमिका निभावली होती. इकबाल या चित्रपटातही तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. तसेच टीव्ही शो कहानी घर घर की मध्ये तिने भूमिका केली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.