ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार पुन्हा हॉस्पीटलमध्ये दाखल

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Updated: Dec 7, 2016, 09:19 AM IST
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार पुन्हा हॉस्पीटलमध्ये दाखल title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

मंगळवारी दुपारी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पायांमध्ये कळा आणि सूज येत असल्यानं तातडीनं त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. 

डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करतेय. ११ डिसेंबरला दिलीपकुमार यांचा ९४ वा वाढदिवस आहे.