दिलीप कुमार यांना मिळू शकतो भारत रत्न

राजकीय क्षेत्रात सध्या एक गोष्टीची जोरदार चर्चा आहे की या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मिळू शकतो. मुस्लिम समाजात भाजपची प्रतिमा उंचाविण्यासाठी हे पाऊल टाकले जाण्याची शक्यता आहे. 

Updated: Jun 11, 2015, 04:15 PM IST
दिलीप कुमार यांना मिळू शकतो भारत रत्न title=

मुंबई : राजकीय क्षेत्रात सध्या एक गोष्टीची जोरदार चर्चा आहे की या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मिळू शकतो. मुस्लिम समाजात भाजपची प्रतिमा उंचाविण्यासाठी हे पाऊल टाकले जाण्याची शक्यता आहे. 

एका वर्तमानपत्राला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९३ वर्षीय दिलीप कुमार यांच्याबाबत काही रुटीन सूचना वेगवेगळ्या माध्यमातून गोळा केली जात आहे. या सूत्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला पद्म पुरस्कार किंवा भारतरत्न पुरस्कार दिला जातो तर ही सामान्य प्रक्रिया आहे. 

केंद्र सरकारने दिलीप कुमार यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला तर प्रकृती खराब असल्याने त्यांना मुंबईतच पुरस्कार प्रदान केला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी पंडीत भीमसेन जोशी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. 

तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार शशी कपूर यांना त्यांच्या निवास स्थानी जाऊ देण्यात आला. त्या प्रकारे दिलीप कुमार यांना मुंबईत जाऊन पुरस्कार दिला जाऊ शकतो, असेही त्या सूत्राने सांगितले. 

तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या घरी जाऊन भारतरत्न प्रदान केला होता. 

पाकिस्तानात जन्न झालेले मुहम्मद युसूफ खान यांना नंतर दिलीप कुमार या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात १९४४ मध्ये ज्वार-भाटा या चित्रपटाने केली. त्यांना १९९१ मध्ये पद्मभूषण, १९९४ मध्ये दादासाहेब फाळके, आणि २०१५ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

दिलीप कुमार यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान निशाण-ए-इम्तियाज पुरस्कार देण्यात आला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.