बाजीराव-मस्तानी VS दिलवाले : कमाईची चढाओढ सुरूच

जुही चावलचा 'चॉक अॅन्ड डस्टर' हा सिनेमा सोडला तर या आठवड्यात दुसरा बिग बिजेट सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे, बाजीराव मस्तानी आणि दिलवाले या दोन सिनेमांत सुरु असलेली कमाईची चढाओढ या आठवड्यातदेखील कायम आहे. 

Updated: Jan 16, 2016, 09:59 AM IST
बाजीराव-मस्तानी VS दिलवाले : कमाईची चढाओढ सुरूच title=

मुंबई : जुही चावलचा 'चॉक अॅन्ड डस्टर' हा सिनेमा सोडला तर या आठवड्यात दुसरा बिग बिजेट सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे, बाजीराव मस्तानी आणि दिलवाले या दोन सिनेमांत सुरु असलेली कमाईची चढाओढ या आठवड्यातदेखील कायम आहे. 

हे दोन्ही सिनेमे जगभरातील जवळपास ३००० सिनेमाघरांत १८ डिसेंबर या एकाच दिवशी प्रदर्शित झालेत. 

घरच्या बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात 'दिलवाले'नं 'बाजीराव-मस्तानी'ला मागे टाकलं असलं तरी आत्ता मात्र तब्बल १७२ करोडोंची कमाई करत रणबीर-दीपिकानं बाजी मारलीय. जगभरात आत्तापर्यंत या सिनेमानं जवळपास ३३५ करोड रुपयांचा गल्ला गोळा केलाय. 

दिलवाले या सिनेमानं आत्तापर्यंत घरच्या बॉक्स ऑफिसवर १३८ कोटी रुपयांची कमाई केलीय. या सिनेमाची जगभरातली कमाई ३६० कोटींवर पोहचलीय.