सोनाक्षीने ट्विटरवर शेअर केला आपल्या बॉयफ्रेंडचा फोटो

सोनाक्षी सिन्हाचे फॅन असलेल्यांसाठी एक बातमी आहे. सोनाक्षीचा बॉयफ्रेंड कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच होती, मात्र तिच्या बॉयफ्रेंडचा शोध लागला आहे. 

Updated: Apr 23, 2015, 07:00 PM IST
सोनाक्षीने ट्विटरवर शेअर केला आपल्या बॉयफ्रेंडचा फोटो title=

मुंबई: सोनाक्षी सिन्हाचे फॅन असलेल्यांसाठी एक बातमी आहे. सोनाक्षीचा बॉयफ्रेंड कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच होती, मात्र तिच्या बॉयफ्रेंडचा शोध लागला आहे. 

सोनाक्षीने स्वत: आपल्या बॉयफ्रेंडची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. तिचा बॉयफ्रेंड बॉलिवूडमधील कोण हिरो नाही तर, हॉलिवूडचा स्टार सुपरहिरो 'आयर्न मॅन' आहे, असे तिने स्वत: ट्वीट करून सांगितले आहे.  

हॉलिवूड सिनेमा 'अॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन'च्या स्पेशल स्क्रिनिंगला अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पीव्हीआरमध्ये आली होती. त्यादरम्यान सोनाक्षीने आयर्नमॅनच्या 

पुतळ्यासोबत फोटो काढला होता. तो फोटो ट्विटरवर शेअर केला आणि ट्विट केलं की, 'मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत हॅंगआऊट करत आहे.'

सोनाक्षी सध्या तिच्या 'अकीरा' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती अॅक्शन स्टंट करतांना दिसणार आहे.

Embedded image permalink

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.