फिल्म रिव्ह्यू : 'ढोलकीचा' सस्पेन्स!

Updated: Aug 29, 2015, 01:02 PM IST
फिल्म रिव्ह्यू : 'ढोलकीचा' सस्पेन्स! title=

 

सिनेमा : ढोलकी
दिग्दर्शक : राजू देसाई, विशाल देसाई
कलाकार : सिद्धार्थ जाधाव, मानसी नाईक, सयाजी शिंदे, कश्मीरा कुलकर्णी आणि इतर

मुंबई : ढोलकी हा मराठी सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. सिद्धार्थ जाधव, मानसी नाइक, कश्मिरा कुलकर्णी, सयाजी शिंदे, ज्योती चांदेकर अशी भली मोठा स्टारकास्ट असलेला, ढोलकी हा सिनेमा एका तमासगीर आणि ढोलकी वादकाची गोष्ट आहे.

एका गावातली ही कहाणी.. या गावात  लाल्या नावाचा एक तरुण आपल्या आईसोबत राहत असतो.. या तरुण बेरोजगार असतो.. एके दिवशी त्याला आपल्याच घरात एक ढोलकी सापडते.. ही ढोलकी कुठली साधारण ढोलकी नसून, त्याला स्पर्श करताच लाल्याच्या हातात एका अत्यंत अनुभवी ढोलकी वादकासारखी कला येते.. लाल्या जिथे कुठे वाजवतो तिथे ढोलकीचे सुर ऐकु येतात.. या ढोलकी मागे काहीतरी रहस्य दजलेलं असतं.. हे रहस्य एक दिवशी उलगडतं, या रहस्याशी त्याच्या वडिलांचाही संबंध असतो.. पण सिनेमाची ही कथा सांगताना मी हे सस्पेंस तुम्हाला सांगणार नाहीये कारण त्यासाठी तुम्हाला सिनेमा पहावा लागेल.

सिद्धार्थ जाधव, मानसी नाइक, कश्मीरा कुलकर्णी, सयाजी शिंदे, ज्योती चांदेकर या सगळ्या नटांनी सिनेमात छान अभिनय केलाय.. सिनेमाचा उत्तरार्ध हा जास्त इंटरेंस्टींग झालाय.. ढोलकी या सिनेमात कॉमेडी आहे, डान्स आहे, सस्पेंन्स आहे, ड्रामा आहे... हे सगळे फॅक्ट्र्स पाहता आम्ही या सिनेमाला देतेय २.५ स्टार्स...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.