FILM REVIEW : अनेक पालकांचं दुखणं मांडतोय 'हिंदी मीडियम'

इरफान खान, सबा कमर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'हिंदी मीडियम' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय साकेत चौधरी यांनी... साकेत यांनी याआधी 'प्यार के साइड इफेक्ट्स' आणि 'शादी के साइड इफेक्ट्स'सारखे सिनेमे दिलेत...

Updated: May 19, 2017, 05:14 PM IST
FILM REVIEW : अनेक पालकांचं दुखणं मांडतोय 'हिंदी मीडियम'

सिनेमा : हिंदी मीडियम

दिग्दर्शक : साकेत चौधरी

कलाकार : इरफान खान, सबा कमर, दीपक दोब्रियाल
 

जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई : इरफान खान, सबा कमर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'हिंदी मीडियम' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय साकेत चौधरी यांनी... साकेत यांनी याआधी 'प्यार के साइड इफेक्ट्स' आणि 'शादी के साइड इफेक्ट्स'सारखे सिनेमे दिलेत...

सिनेमाची ट्रू स्टोरी

ही गोष्ट आहे राज आणि मीता या दोन पात्रांची... ज्या व्यक्तिरेखा साकरल्या आहेत अभिनेता इरफान खान आणि सबा कमरनं... दिल्लीतल्या चांदनी चौक या भागात राहणारा राज एक छोटा व्यावसायिक आहे, ज्याला इंग्रजी येत नाही, तर त्याची बायको मीता छान इंग्लिश बोलते... त्याच्या बायकोची इच्छा आहे की त्यांच्या मुलीनं इंग्रजी शाळेत शिकावं... ज्यामुळे हे दोघं तिच्या अॅडमिशनच्या तयारीत लागतात. या सगळ्या प्रोसेस दरम्यान या दोघांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. याचं कारण असं की मुलीच्या अॅडमिशनआधी शाळेकडून पालकांची मुलाखत घेतली जाते... मुलीला अॅडमिशन मिळावं यासाठी हे दोघं वाट्टेल ते करायला तयार होतात... पुढे काय काय घडत जातं हे पाहणं खरंच मजेशीर ठरतं...

कमालीचे संवाद

सिनेमाची कहाणी प्रेक्षकांना धरून ठेवते... याचं कारण असं की या सिनेमाच्या कथेशी प्रेक्षक स्वत:ला जोडून घेताना दिसतात... सिनेमात ड्रामा आहे, कॉमेडी आहे, विशेष करुन सिमातले संवाद कमाल आहेत...

अभिनेता इरफान खान या भूमिकेसाठी एकदम परफेक्ट बसतो. त्याचा अभिनय, त्याचा वावर, त्याची डायलॉग डिलीवरी, बॉडी लॅन्ग्वेज या सगळ्याच गोष्टींसाठी त्याला 100 पैंकी 100... या सिनेमात इरफानची साथ देतेय पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर... सबा कमरचा अभिनयही छान झालाय. तिच्या व्यक्तिरेखेला तिनं पुर्णपणे न्याय दिलाय. 

दिग्दर्शक साकेत चौधरी यांनी सिनेमाला उत्तम ट्रीटमेन्ट दिली आहे. सिनेमाचा स्क्रिनप्लेही छान झालाय. 'हिंदी मीडियम' या सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स पाहता आम्ही या सिनेमाला देतोय 3.5 स्टार्स...