फिल्म रिव्ह्यू : मराठमोळ्या 'पोश्टर गर्ल'नं उडवली प्रेक्षकांची झोप

मराठी सिनेजगतातला 'द मोस्ट अवेटेड' असा 'पोश्टर गर्ल' प्रदर्शित झालाय. सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, ह्रषिकेश जोशी अशी कलाकारांची भली मोठी फौज घेऊन आलेत...

Updated: Feb 12, 2016, 03:11 PM IST
फिल्म रिव्ह्यू : मराठमोळ्या 'पोश्टर गर्ल'नं उडवली प्रेक्षकांची झोप title=

सिनेमा : पोश्टर गर्ल

दिग्दर्शक : समीर पाटील

लेखन : हेमंत ढोमे

संगीत : अमीत राज

मुंबई : मराठी सिनेजगतातला 'द मोस्ट अवेटेड' असा 'पोश्टर गर्ल' प्रदर्शित झालाय. सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, ह्रषिकेश जोशी अशी कलाकारांची भली मोठी फौज घेऊन आलेत दिग्दर्शक समीर पाटील या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. 

सिनेमाचा ट्रू स्टोरी

श्रयेस तळपदे आणि दिग्दर्शक समीर पाटील यांचा पोश्टर बॉइज हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच... याच दिगदर्शक समीर पाटील यांचाच 'पोश्टर गर्ल' हा सिनेमा आज बिग स्क्रीनवर झळकलाय. टेकवडे या छोट्याशा गावाची ही गोष्ट... या गावात केवळ पुरुषांची मक्तेदारी चालते. मुलगी जन्माला आली की ती टाकून दिली जाते... मुलींना या गावात स्थान नाही, पण याच गावात जेव्हा 'पोश्टर गर्ल'ची अर्थातच रुपालीची एन्ट्री होते तेव्हा काय होतं??

रुपाली जी व्यक्तिरेखा साकारली आहे सोनाली कुलकर्णीनं... काय घडतं जेव्हा रुपाली ही एकमेव मुलगी या गावात पाऊल टाकते... तिच्या काकांकडे ती रहायला येते... रुपालीच्या येण्यानं काकांची पंचाईत होते. काका गरीब जरी असला तरी रुपालीच्या येण्यानं त्याचे दिवस कसे बदलतात. गावातली सगळी मुलं रुपालीच्या मागे असल्यामुळे काकाचेही भरपूर लाड पुरवले जातात. या गावातल्या लोकांच्या मानसिकतेत रुपालीमुळे काही बदल होतो का? आणि हा बदल चांगला आहे की वाईट? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला 'पोश्टर गर्ल' हा सिनेमा पहावा लागेल...

सिनेमाची जमेची बाजू

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी हा सिनेमा तिच्या करियरच्या दृष्टीकोणातून नक्कीच महत्वाचा ठरेल... सिनेमातली तिची भूमिका नेहमीपेक्षा हटके आहे. तिचा परफॉर्मन्स छान झालाय. अभिनेता जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, संदीप पाठक, सिद्दार्थ मेनन या सगळ्यांनी आपल्या आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. पोश्टर बॉईजनंतर पोश्टर गर्ल करणं खरं तर दिग्दर्शक समीर पाटीलसाठी सोपं नसेल... कारण, पोस्टर बॉईज या सिनेमानं बॉक्स ऑफीसवर चांगला गल्ला जमवला होता. त्याच ब्रॅन्डचा आणखी एक सिनेमा करणं तो ही इतक्याच ताकदीचा हे आव्हान त्यांनी छान पेललंय. सिनेमाची मांडणी, त्याला देण्यात आलेली ट्रीटमेन्ट कमाल आहे.

सिनेमातलं संगीत

पोश्टर गर्ल या सिनेमाचं संगीत ही छान झालंय. विशेष करुन 'आवाज वाढव डीजे' तर अगोदरपासूनच वायरल झालाय. या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे या सिनेमाचे संवाद... पोश्टर हर्ल हा एक कम्प्लिट मसाला एन्टरटेन्मेंट सिनेमा तर आहेच पण त्याच बरोबर सिनेमात काही सामाजिक संदेशही देण्यात आलेत.

कालकारांचा टाईमिंग आणि सिनेमाचा स्क्रीनप्ले सुंदर झालाय. तेव्हा या सगळ्या गोष्टी पाहता मी पोश्टर गर्ल या सिनेमाला आम्ही देतोय ३.५ स्टार्स...