फिल्म रिव्ह्यू : 'ट्वीस्ट अॅन्ड टर्न्स'चा 'उर्फी'

Updated: Nov 27, 2015, 02:06 PM IST
फिल्म रिव्ह्यू : 'ट्वीस्ट अॅन्ड टर्न्स'चा 'उर्फी' title=

 

सिनेमा : उर्फी
दिग्दर्शक : शिवाजी लोटन पाटील
कलाकार : प्रथमेश परब, मिताली मयेकर, कविता लाड, मिलींद फाटक, उपेंद्र लिमये

जयंती वाघधरे, मुंबई : बालक पालक, टाईमपास अशा सिनेमातून आपली एक स्वतंत्र ओळख करणारा अभिनेता प्रथमेश परब पुन्हा एकदा 'उर्फी' या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीला आलाय. विक्रम प्रधान दिग्दर्शित या सिनेमात मिताली मयेकर, कविता लाड, मिलींद फाटक, उपेंद्र लिमये अशी कलाकारांची भट्टी या सिनेमात जमली आहे.

'देवा' या इस्टेट एजंडची ही गोष्ट आहे, जी भूमिका साकारली आहे अभिनेता प्रथमेश परबनी... आपल्या मित्रांसोबत मजा मस्ती करणाऱ्या देवाला एक मुलगी पसंत पडते... या मुलीला इंप्रेस करण्यासाठी तो तिच्या आई वडिलांनाही इंप्रेस करण्याचे प्रयत्न करत असतो. हा सिनेमा खरंतर या दोघांची एक अनोखी प्रेम कहाणी आहे. 

सिनेमाचा फर्स्ट हाफ हा जवळ जवळ टाईमपास-३ आहे असं म्हणायला हरकत नाही... पण या सिनेमाचा सेकेंड हाफ पूर्णपणे वेगळा आहे, जो खऱं इथं सांगता येणार नाही... या सिनेमाच्या सेकेन्ड हाफमध्ये बरच काही दडलंय ज्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागेल. एकीकडे इंटरव्हलचा पहिला भाग हा प्रथमेशचा असला तर इंटरवलचा दुसरा भाग हा उपेंद्र लिमयेचा आहे. इंटरव्हलनंतर ही फिल्म असं काही वळण घेते कि प्रेक्षकांसाठी ते पचवणं सोपं नाही...

अधिक वाचा - 'तमाशा'सहीत पाच मराठी सिनेमे मोठ्या पडद्यावर, तुमचा ऑप्शन कोणता?

या सिनेमाचं दिग्दर्शन करत असताना दिग्दर्शकानं असे काही 'ट्वीस्ट अॅन्ड टर्न्स' दिलेत की ज्याचा परिणाम या सिनेमाच्या फ्लोवर झालाय... सिनेमाची कथाही भरकटलेली वाटते...

व्हिडीओ | पाहा 'उर्फी' सिनेमाचा प्रोमो

या सिनेमातल्या गाण्य़ांविषयी सांगायचं झालं तर यातली गाणी या सिनेमाची स्ट्रेन्थ आहे. चिनार महेशनं सिनेमाला छान संगीत दिलंय.  प्रथमेशचा तोच तोच अंदाज उर्फीमध्ये पहायला मिळतो, त्यामुळे मध्यंतराच्या आधी प्रथमेश जितका आपलासा वाटतो तितकाच मध्यंतरानंतर तो परका वाटतो... उपेंद्र लिमयेनं साकारलेला एटीएस ऑफिसर त्यानं चोख पार पाडला आहे. 

अधिक वाचा - 'दगडू' झाला 'देवा', प्रथमेश 'उर्फी'मध्ये करतोय 'धनक-धनक', ऐका गाणं

'उर्फी' या सिनेमातले हे सगळे फॅक्टस् पाहता आम्ही या सिनेमाला मी देतोय २.५ स्टार्स... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.