'बाहुबली' प्रभासबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

'बाहुबली' या बिग बजेट सिनेमाचा मुख्य अभिनेता प्रभास सध्या यशाची चव चाखतोय. या सिनेमातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलीय. 

Updated: Jul 28, 2015, 01:38 PM IST
'बाहुबली' प्रभासबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? title=

मुंबई : 'बाहुबली' या बिग बजेट सिनेमाचा मुख्य अभिनेता प्रभास सध्या यशाची चव चाखतोय. या सिनेमातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलीय. 

एस एस राजामौली यांच्या 'बाहुबली'नं एव्हाना बॉक्स ऑफीसवर अनेक रेकॉर्ड सेट केलेत. हा सिनेमा बनवण्यासाठी तब्बल 250 करोड खर्च झालाय. या सिनेमानंतर या सिनेमाचा 'बाहुबली' म्हणजेच अभिनेता प्रभास प्रकाशझोतात आलाय. याच प्रभातबद्दल अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला क्वचितच माहित असतील...

  • प्रभास  हा तेलगु अभिनेता असला तर तुम्ही त्याला याआधीही पाहिलं असेल... अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या 'अॅक्शन जॅक्सन' या सिनेमातही प्रभास दिसला होता.  

  • अभिनेता प्रभास  म्हणजे तेलगु अभिनेता उप्पालापटी कृष्णम राजू यांचा पुतण्या...

  • 'बाहुबली'तल्या शिवुदू भूमिकेसाठी तयारी करताना प्रभातला आपल्या वजन वाढवावं लागलं... तेही चरबीशिवाय... त्यासाठीच सिने निर्मात्यांनी प्रभासला बॉडी बिल्डींगसाठी साधनसामग्री पुरवली होती... याच साधनांची किंमत जवळपास दीड करोडोंच्या घरात होती, असंही सांगितलं जातंय. 

  • शिवुदूवर प्रेम करणाऱ्या सगळ्या तरुणींसाठी कदाचित ही निराशाजनक बातमी असेल... पण, प्रभासच्या लग्नाची तयारी सुरू आहे. डिसेंबर 2015 मध्ये प्रभास विवाहबंधनात अडकणार आहे. राजामौली यांच्या 'बाहुबली'वर लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रभासनं आपलं लग्न पुढे ढकललं होतं. 

  • या सिनेमाप्रती प्रभासचं 'डेडिकेशन' इतकं स्ट्राँग होतं की त्यानं हा सिनेमा शूट करत असताना इतर कोणताही सिनेमा स्वीकारला नाही. तीन वर्षांपासून तो या प्रोजेक्टवर काम करतोय. 

  • 'बाहुबली'नं बॉक्स ऑफिसवर बक्कळ यश मिळवल्यानंतर आता समाधानानं प्रभासनं काही काळासाठी ब्रेक घेतलाय आणि तो सध्या युरोपमध्ये आपलं यश सेलिब्रेट करतोय. 

  • ब्रेकनंतर परतल्यानंतर लगेचच प्रभास 'बाहुबली 2'वर काम सुरू करणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.