रितेशबाबत जेनेलियाची का होती निगेटीव्ह इच्छा?

अभिनेता-निर्माता रितेश देशमुख याने 'एक विलन' चित्रपटात नकारात्मक भूमिका केली आहे. रितेशची पत्नी जेनेलिया हिची तशी इच्छा होती. रितेशने नकारात्मक भूमिका म्हणजे व्हिलनची करावी, अशी इच्छा होती, अशी माहीती रितेशनेच दिली.

Updated: Jun 28, 2014, 06:16 PM IST
रितेशबाबत जेनेलियाची का होती निगेटीव्ह इच्छा? title=

मुंबई : अभिनेता-निर्माता रितेश देशमुख याने 'एक विलन' चित्रपटात नकारात्मक भूमिका केली आहे. रितेशची पत्नी जेनेलिया हिची तशी इच्छा होती. रितेशने नकारात्मक भूमिका म्हणजे व्हिलनची करावी, अशी इच्छा होती, अशी माहीती रितेशनेच दिली.

रितेश सांगितले, जेनेलिया नेहमी बोलत होती नकारात्मक नाहितर खलनायकची भूमिका कर. जेव्हा 'एक विलन' या सिनेमाचा प्रस्ताव आला, तेव्हा विचार करुन या प्रस्तावाला हो बोललो. त्यामुळे जेनेलियाही खूप खूश होती. 

मोहित सूरी याने 'एक विलन' हा चित्रपट दिग्दर्शीत केलाय. यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूरने प्रमुख भूमिका केली आहे. 

'एक विलन'च्या नकारात्मक भूमिकेबद्दल रितेशने सांगितले, अभिनेता म्हणून मला ही इच्छा होती. या चित्रपटातील भूमिका खूप वेगळी होती. हा चित्रपट माझ्यासाठी खूप चांगला अनुभव आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.