मी प्रेग्नंट नाही आणि माझे लग्नही झालेले नाहीये - दीपिका

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलेय. काहींनी तर ते नात्यात अडकल्याचेच म्हटलेय.

Updated: Jul 21, 2016, 01:51 PM IST
मी प्रेग्नंट नाही आणि माझे लग्नही झालेले नाहीये - दीपिका title=

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलेय. काहींनी तर ते नात्यात अडकल्याचेच म्हटलेय.

या सर्व चर्चांना अखेर खुद्द दीपिकाने पूर्णविराम दिलाय. रणवीरसोबतच्या तिच्या रिलेशनशिपबद्दल सुरु असलेल्या उलट सुलट चर्चांना अखेर तिने उत्तर दिलेय. 

'मी प्रेग्नंट नाहीये, माझे लग्न झालेले नाहीये, तसेच मी रिलेशनशिपमध्येही नाहीये,' असे दीपिकाने दिल्ली येथे सुरु असलेल्या इंडिया कल्चर वीक सोहळ्यादरम्यान सांगितले.