'मीही ठरले वर्णभेदाची शिकार'

अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिनेत्री सोनम कपूर नुकताच एक धक्कादायक खुलासा केलाय. 'मी देखील वर्णभेदाची शिकार ठरलीय' असं वक्तव्य सोनमनं केलंय. 

Updated: Dec 11, 2015, 10:36 PM IST
'मीही ठरले वर्णभेदाची शिकार' title=

नवी दिल्ली : अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिनेत्री सोनम कपूर नुकताच एक धक्कादायक खुलासा केलाय. 'मी देखील वर्णभेदाची शिकार ठरलीय' असं वक्तव्य सोनमनं केलंय. 

एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना ३० वर्षीय सोनमनं हा खुलासा केलाय. भारतातल्या 'असहिष्णुते'वरही तिनं या कार्यक्रमात तिचं मत मांडलंय. 

'असहिष्णुता हा खूप व्यापक शब्द आहे. मला अनेक देशांत वर्णभेदाचा सामना करावा लागला. ते सावळ्या रंगाची त्वचा पाहतात आणि तुमच्याबद्दल अगोदरच धारणा करून घेतात. जेव्हा केव्हा मी परदेशात जाते तेव्हा लोकांची अगोदरच तुमच्याबद्दल धारणा बनलेली असते. जसं की तुम्ही नेहमी पडद्यात राहतात किंवा तुमचे आई-वडील खूप रुढीवादी आणि परंपरावदी आहेत' असं यावेळी सोनमनं म्हटलंय. 

हिट अॅन्ड रन प्रकरणात सलमान खान निर्दोष सुटल्याच्या विषयावर सोनमनं आपण खूप खूश असल्याचं म्हटलंय. ती नुकतीच सलमानसोबत 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमात दिसली होती.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.