सातवेळा जेम्स बॉडची भूमिका करणारे अभिनेता रॉजर मूर यांचे निधन

 सात वेळा जेम्स बॉडची भूमिका करणारे अभिनेता रॉजर मूर यांचे आज निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 23, 2017, 08:19 PM IST
 सातवेळा जेम्स बॉडची भूमिका करणारे अभिनेता रॉजर मूर यांचे निधन  title=

स्वित्झर्लंड :  सात वेळा जेम्स बॉडची भूमिका करणारे अभिनेता रॉजर मूर यांचे आज निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. 

स्वित्झर्लंड येथे राहणारे मूर हे गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांची ही झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली. 

रॉजर, 'दि स्पाई हू लव्ड मी' आणि 'लिव एंड लेट डाई' सारख्या सुपरहिट बॉन्ड चित्रपटात काम केले होते. 

बॉन्डची भूमिका करणारे ते तिसरे अभिनेता होते. १९७३ ते १९८५ पर्यंत त्यांनी सात वेळा ही भूमिका निभावली.