करण जोहरने लैंगिकतेवर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्याचा घेतला समाचार

Updated: Jun 30, 2015, 04:03 PM IST
करण जोहरने लैंगिकतेवर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्याचा घेतला समाचार title=
 
 
 मुंबई : नुकतंच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाह म्हणजेच होमोसेक्शुअल मॅरेजला कायदेशीर मान्यता दिली आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीने प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यावर भडकलेल्या करणने एका देशात घेतलेल्या चांगल्या निर्णयाची खिल्ली उडवणं योग्य नसल्याचं मत नोंदवलंय.
 
 लवकरच करण जोहर अमेरिकेत जाऊन लग्न करणार असल्याचे ट्विट या व्यक्तीने केलं होतं. या ट्विटनंतर करण जोहरने त्या व्यक्तीचा चांगलाच समाचार घेतलाय. समलैंगिक संबंधांना मान्यता देणं हे एका प्रगतीशील निर्णयाची खिल्ली उडवण्यासारखं असल्याचंही त्यानं म्हटलय.
 
 संबंधीत व्यक्तीच्या ट्विटला रिट्विट करत त्यानं ट्विटकर्त्याचा समाचार घेतलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.