पहिल्या चित्रपटासाठी 'गानकोकिळे'नं दिल्या कपिलला शुभेच्छा!

कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या आगामी चित्रपटातून अभिनेता म्हणून लोकांसमोर येण्याचा प्रयत्न करतोय. कपिलच्या याच प्रयत्नाला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही शुभेच्छा दिल्यात.

Updated: Sep 21, 2015, 09:26 AM IST
पहिल्या चित्रपटासाठी 'गानकोकिळे'नं दिल्या कपिलला शुभेच्छा! title=

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या आगामी चित्रपटातून अभिनेता म्हणून लोकांसमोर येण्याचा प्रयत्न करतोय. कपिलच्या याच प्रयत्नाला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही शुभेच्छा दिल्यात.

८५ वर्षीय गानकोकिळेनं कपिल शर्मा याला त्याच्या आगामी चित्रपटासाठी आपल्या ट्विटर अकाऊंटची मदत घेतलीय. 

'कपिल शुभेच्छा.... तुझा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होतोय... याचबद्दल मला तुझं अभिनंदन करायचंय... तुला यश मिळो हीच इच्छा' असं लता मंगेशकर यांनी ट्विटरवर म्हटलंय.

छोट्या स्क्रीनवर 'कॉमेडी नाईटस'च्या माध्यमातून कपिलनं आजवर भल्याभल्यांना हसायला भाग पाडलंय. कपिलचा अब्बास-मस्तान दिग्दर्शित 'किस किसको प्यार करू' हा सिनेमा येत्या २५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमात कपिलसोबतच एली अवराम, मंजिरी फडणीस, सिमरन कौर मंडी, साई लोकुरवर्ड, अरबाझ खान आणि वरूण शर्मा हेदेखिल दिसणार आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.