नागराज मंजुळे ऑलिम्पिक विजेत्या महिलांबद्दल बोलला असं काही

 झी मराठीच्या उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्यात सैराटचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांच्या हस्ते सेलिंग या क्रीडा प्रकारात भरिव कामगिरी करणाऱ्या महिलाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

Updated: Aug 26, 2016, 07:13 PM IST
नागराज मंजुळे ऑलिम्पिक विजेत्या महिलांबद्दल बोलला असं काही title=

मुंबई :  झी मराठीच्या उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्यात सैराटचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांच्या हस्ते सेलिंग या क्रीडा प्रकारात भरिव कामगिरी करणाऱ्या महिलाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

यावेळी नागराज मंजुळे याने ऑलिम्पिक विजेत्या महिलांचा गौरव केला. तसेच समाजात महिलांना किती कमी महत्त्व दिले  यावर प्रकाश टाकला. नागराजच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. 

पाहा नेमका काय बोलला नागराज...

कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याची नुसती दखल न घेता त्यांच्या कार्याचा य़थोचित सन्मान करण्यासाठी झी मराठी वाहिनीने ‘उंच माझा झोका पुरस्कार’ या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरूवात केली. यंदा या पुरस्काराचं हे चौथं वर्ष आणि याही वर्षी समाजकारण,  क्रीडा, पर्यावरण, आरोग्य, विज्ञान, अशा विविध क्षेत्रांत केवळ राज्यातच नव्हे तर देशात आणि जगात आपल्या कार्याचा ठसा उमटवणा-या कर्तृत्वशालिनींचा गौरव करण्यात आला. येत्या 28 ऑगस्टला सायंकाळी 7 वा. झी मराठीवरून हा पुरस्कार सोहळा प्रसारित होणार आहे.