बिकनीतल्या फोटोवर आलेल्या कमेंटमुळे नेहा धुपिया भडकली

सुट्टी एन्जॉय करत असलेल्या नेहा धुपियानं समुद्रावरचे तिचे बिकनीमधले काही फोटो सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Updated: Jun 12, 2016, 09:16 PM IST
बिकनीतल्या फोटोवर आलेल्या कमेंटमुळे नेहा धुपिया भडकली title=

मुंबई : सुट्टी एन्जॉय करत असलेल्या नेहा धुपियानं समुद्रावरचे तिचे बिकनीमधले काही फोटो सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंवर आलेल्या घाणेरड्या कमेंट्समुळे नेहा धुपिया चांगलीच भडकली आहे. 

मी समुद्रावर बिकनी घालून गेले होते. समुद्रावर बहुतेक जण बिकनी घालूनच जातात, मी बिकनीवर सेल्फी घेतला आणि तो शेअर केला आहे. कोणत्याही महिलेला सोशल नेटवर्किंगवर फॉलो करताना तिचा अपमान होईल, असं वागू नका, तिच्या वॉलवर आपलं फ्रस्ट्रेशन काढू नका, अशी प्रतिक्रिया नेहानं दिली आहे.

 

याआधी महादेव या मालिकेमध्ये पार्वतीचं काम करणारी अभिनेत्री सोनारिका भदोरियानंही समुद्रावरचे तिचे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. सोनारिकाच्या या फोटोंवरही अश्लिल कमेंट आल्या होत्या.