रजनीकांतच्या कबालीची रिलीज आधीच 200 कोटींची कमाई

बॉलीवूडमध्ये सलमान, शाहरुख आणि आमिर या तिन्ही खानचे चित्रपट बक्कळ कमाई करतात पण रजनीकांत मात्र या तिन्ही खान मंडळींवर भारी पडला आहे.

Updated: Jun 12, 2016, 06:24 PM IST
रजनीकांतच्या कबालीची रिलीज आधीच 200 कोटींची कमाई title=

मुंबई : बॉलीवूडमध्ये सलमान, शाहरुख आणि आमिर या तिन्ही खानचे चित्रपट बक्कळ कमाई करतात पण रजनीकांत मात्र या तिन्ही खान मंडळींवर भारी पडला आहे. रजनीकांतचा कबाली या चित्रपटानं रिलीज आधीच 200 कोटींची कमाई केली आहे. कबाली हा चित्रपट दक्षिणेतल्या एका वितरकानं 200 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. 

कबाली हा चित्रपट जगभरातल्या तब्बल 5 हजार स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. रजनीकांतचा हा चित्रपट मल्याळी, चायनीज आणि थाय या भाषांमध्ये डब केला आहे. हा चित्रपट थायलंड आणि अमेरिकेमधल्या 500 चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.