रितेशच्या 'बंगिस्तान'वर पाकिस्ताननंतर सिंगापूर, अरब देशांतही बंदी!

रितेश सिधवानी याचा 'बंगिस्तान' या सिनेमावर आता सिंगापूर आणि अरब देशांतही बंदी घालण्यात आलीय. या देशांतील सेन्सॉर बोर्डानं हा सिनेमा इथं न दाखवण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Aug 7, 2015, 10:40 AM IST
रितेशच्या 'बंगिस्तान'वर पाकिस्ताननंतर सिंगापूर, अरब देशांतही बंदी! title=

नवी दिल्ली : रितेश सिधवानी याचा 'बंगिस्तान' या सिनेमावर आता सिंगापूर आणि अरब देशांतही बंदी घालण्यात आलीय. या देशांतील सेन्सॉर बोर्डानं हा सिनेमा इथं न दाखवण्याचा निर्णय घेतलाय. 

ही माहिती खुद्द या सिनेमाचा निर्माता रितेश सिधवानीनं दिलीय. 'बंगिस्तानला पाकिस्ताननं बॅन केलं. यूनायटेड अरब अमीरातनं बॅन केलं, आता मला कळतंय की सिंगापूरमध्येही बॅन केलं जाऊ शकतं. या देशांतील सेन्सॉर बोर्डानं आमच्या या सिनेमात काय चुकीचं पाहिलं? ते लिखित स्वरुपात द्यावं. मला आश्चर्य वाटतंय की कशा पद्धतीनं एका चांगल्या संदेशाचा चुकीचा अर्थ काढला जातोय' असं रितेशनं ट्विटरवर म्हटलंय. 

'बंगिस्तान'वर पहिल्यांदा पाकिस्ताननं बंदी घातली होती. यावेळी, त्यांनी बंगिस्तान हे नाव पाकिस्तानशी मिळतं जुळतं असल्याचं म्हटलं होतं. या सिनेमात नॉर्थ बंगिस्तान नावाच्या एका भागाचा उल्लेख आहे, हा नॉर्थ पाकिस्तानशी मेळ खातो.

भारत आणि पाकिस्तान दहशतवादामुळे जास्त त्रस्त आहे. हसत-खेळत दहशतवादाविरुद्ध संदेश देण्याचा या सिनेमाचा प्रयत्न होता. या सिनेमाची कथा किंवा कोणतंही नाव काल्पनिक नाही. या सिनेमाच्या नावाला पाकिस्तानचा आक्षेप नसावा कारण बंगिस्तान हे नाव अफगाणिस्तानशीही मिळतं जुळतं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.