11 गोळ्या झाडून पाकिस्तानी अभिनेत्रीची हत्या

पाकिस्तानी अभिनेत्री किस्मत बेगची 11 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

Updated: Nov 25, 2016, 06:40 PM IST
11 गोळ्या झाडून पाकिस्तानी अभिनेत्रीची हत्या  title=

लाहोर : पाकिस्तानी अभिनेत्री किस्मत बेगची 11 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लाहोरमध्ये स्टेज शो संपल्यानंतर किस्मत गाडीनं घरी जात होत्या, यावेळी बाईकवरून आलेल्या काही अज्ञातांनी किस्मतला रस्त्यात थांबवलं आणि तिच्यावर गोळीबार केला. या अज्ञातांनी किस्मतबरोबरच तिच्या ड्रायव्हरवरही हल्ला केला. 

या हल्ल्यानंतर किस्मत आणि ड्रायव्हरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी किस्मतला मृत घोषित केलं. ड्रायव्हरवर मात्र अजून उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

किस्मतच्या मृत्यूमागे तिचा आधीचा प्रियकर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याआधीही किस्मतवर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता पण यातून ती वाचली होती. किस्मत ही पाकिस्तानी रंगभूमीवरील अभिनेत्री होती.