'बे वॉच' असेल प्रियांकाचा पहिला हॉलिवूड सिनेमा

'देसी गर्ल' प्रियांका चोपडा सध्या बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये सक्रिय झालेली दिसतेय. आता लवकरच ती एका हॉलिवूडच्या चित्रपटात दिसली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. 

Updated: Jan 14, 2016, 09:55 AM IST
'बे वॉच' असेल प्रियांकाचा पहिला हॉलिवूड सिनेमा title=

मुंबई : 'देसी गर्ल' प्रियांका चोपडा सध्या बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये सक्रिय झालेली दिसतेय. आता लवकरच ती एका हॉलिवूडच्या चित्रपटात दिसली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. 

'क्वांटिको' या टीव्ही सीरियलमधून अमेरिकेच्या छोट्या पडद्यावरून घराघरांत दाखल झालेली आणि सगळ्यांची लाडकी बनलेली प्रियांका लवकरच 'बे वॉच' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती एका खलनायिकेची भूमिका साकारू शकते.   

'बे वॉच' या सिनेमात प्रियांका टीव्ही सुपरस्टार ड्वेन जॉन्सन आणि जॅक एफ्रॉन यांच्यासोबत दिसणार आहे. हे जर यशस्वी झालं तर प्रियांकाचा हा पहिला हॉलिवूड चित्रपट असेल. 'बे बॉच' हा १९९० च्या दशकातील टीव्ही सीरिजवर आधारीत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सेठ गॉर्डन करत आहे. 

'क्वान्टिको'मुळे अमेरिकेत स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यश मिळाले आहे. ‘बे वॉच’चे शूटिंग व ‘क्वॉन्टिको’च्या तारखांचा मेळ साधण्याचा प्रयत्न केला जातोय.