रणबीरनं मैत्रिण अनुष्काला दिलं स्पेशल गिफ्ट

'बॉम्बे वेलवेट'चे नायक आणि नायिका म्हणजेच रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सोशल वेबसाईटवर वायरल झालेला दिसतोय. 

Updated: May 29, 2015, 04:18 PM IST
रणबीरनं मैत्रिण अनुष्काला दिलं स्पेशल गिफ्ट  title=

मुंबई : 'बॉम्बे वेलवेट'चे नायक आणि नायिका म्हणजेच रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सोशल वेबसाईटवर वायरल झालेला दिसतोय. 

'बॉम्बे वेलवेट' बॉक्स ऑफिसवर पिटला असला तरी रणबीर आणि अनुष्काच्या मैत्रीची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल वेबसाईटवर वायरल झालेल्या या फोटोत रणबीर कपूर अनुष्का शर्मा हिला एक अतिशय स्पेशल असं गिफ्ट देताना दिसतोय. 

हे गिफ्ट नक्कीच स्पेशल आहे... कारण रणबीरनं अनुष्काला एक फोटो फ्रेम गिफ्ट केलीय... यामध्ये अनुष्काचा बॉयफ्रेंड विराट कोहली याचा कॅच पकडतानाचा एक फोटोही आहे. 

हे गिफ्ट स्वीकारताना अनुष्का शर्माही भलतीच खूश दिसतेय. त्यामुळे तिलाही हे स्पेशल गिफ्ट आवडलंय. हे नक्की... 

'पीके'फेम अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सध्या भारतीय क्रिकेटर विराट कोहली याच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे बातम्यांची हेडलाईन बनताना दिसतेय. वर्ल्डकपमध्येही या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. शिवाय, वर्ल्डकपच्या पराभवानंतर अनुष्का शर्मा हिला टार्गेट करणाऱ्यांना विराट कोहलीनं चांगलाच दमही भरला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.