रणवीर - अनुष्काचं पुन्हा जुळलं सूत?

सध्या रणवीर सिंग आपल्या एक्स गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत इस्तांबूलमध्ये शुटींगसाठी बिझी आहे. दिग्दर्शिक झोया अख्तर हिचा आगामी सिनेमा ‘दिल धडकने दो’मध्ये ही जोडपं पुन्हा एकत्र दिसणार आहे. 

Updated: Jul 5, 2014, 11:08 PM IST
रणवीर - अनुष्काचं पुन्हा जुळलं सूत? title=

मुंबई : सध्या रणवीर सिंग आपल्या एक्स गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत इस्तांबूलमध्ये शुटींगसाठी बिझी आहे. दिग्दर्शिक झोया अख्तर हिचा आगामी सिनेमा ‘दिल धडकने दो’मध्ये ही जोडपं पुन्हा एकत्र दिसणार आहे. 

सोशल साईटसवर फिल्मसच्या शूटींगचे फोटो शेअर झालेत. त्या फोटोमध्ये सिनेमातील बाकी सर्व कलाकार एकमेकांसोबत दिसले. मात्र अनुष्का आणि रणवीर कोणत्याच फोटोत एकत्र दिसले नव्हते... शूटींग दरम्यानही दोघांनी एकमेकांना एका अंतरावरच ठेवलं होतं...  

पण, यानंतर अचानक रणवीरनं ट्विटर या सोशल वेबसाईटवर एका असा फोटो शेअर केला की त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहीलं नाही... हा फोटो होता रणवीर आणि अनुष्काचा... इतर कुणीही त्यात दिसत नाहीए... 

हा फोटो शेअर करताना, हा फोटो म्हणजे सिनेमातल्या एखाद्या सीनचा आहे की ऑफ स्क्रिनचा याबद्दल मात्र रणवीरनं त्याच्या चाहत्यांची उत्सुकता कायम ठेवलीय.  


सौ. ट्विटर

रणवीरने या फोटोशिवाय आणखीही काही फोटो शेअर केलेत. त्यात रणवीर अनिल कपूरसोबत पोज देताना दिसतोय..  आणखी एका फोटोत रणवीर एकटाच आहे. ‘दिल धडकने दो’ या सिनेमात प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, अनिल कपूर, राहुल बोस, शेफाली शाह यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

रणवीर आणि अनुष्का ही जोडी पहिल्यांदा ‘बॅंड बाजा बारात’ या सिनेमात एकत्र दिसले होते... ही जोडी प्रेक्षकांनाही भावली होती. त्यानंतर ‘लेडिज वर्सेज रिकी बहल’ या चित्रपटात हे दोघे पुन्हा एकत्र आले... आणि त्यानंतर त्यांच्या अफेअरची जोरात चर्चा सुरु झाली... त्यानंतर दोघांच्या ब्रेकअपचीही बातमी आली... नंतर विराट कोहली – अनुष्का शर्मा यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. 

सध्या रणवीर सिंग दीपिका पादूकोणसोबत डेटींग करत असल्याच्याही चर्चा आहेत. तसंच अनुष्का आणि क्रिकेटर विराट कोहली प्रेमाच्या चर्चा सुरुच आहेत.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.