सलमानबद्दल रवीना म्हणतेय, जैसी करनी वैसी भरनी

बॉलिवूडची अभिनेत्री रवीना टंडनने सलमान खानच्य हिट अॅंड रन केसबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान सलमानच्या शिक्षेबाबत रवीनाला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलतांना रवीना बोलली की, 'जिसने जो कर्म किया है, वह वैसा भरेगा.'

Updated: May 12, 2015, 04:21 PM IST
सलमानबद्दल रवीना म्हणतेय, जैसी करनी वैसी भरनी title=

मुंबई: बॉलिवूडची अभिनेत्री रवीना टंडनने सलमान खानच्या 'हिट अॅंड रन' प्रकरणात केलेल्या वक्तव्यामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत.

एका कार्यक्रमा दरम्यान बोलताना सलमान खानच्या शिक्षेबाबत रवीनाला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर रवीनानं 'जिसने जो कर्म किया है, वह वैसा भरेगा' असं उत्तर देत प्रश्न विचारण्याची बोलतीच बंद केली.

पण, यामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत. कारण, सत्र न्यायालयानं सलमान खानला हिट अॅंड रन प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सलमानच्या घरी कुटुंबाचं सांत्वन करण्यास गेलेल्या मंडळींमध्ये रवीनाचाही समावेश होता. अर्थातच यामुळे रवीनानं आता केलेलं हे वक्तव्य इतरांना बुचकळ्यात टाकतंय. 

रवीनाला सलमानची चांगली मैत्रीण म्हणून ओळखलं जाते. दोघांनी 'अंदाज अपना अपना', 'पत्थर के फुल', 'कही प्यार ना हो जाए' यांसारख्या सिनेमात एकत्र कामही केलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.