व्हिडिओ : सलमान खानने रंगवली आदिवासी वाडी

(रायगड) सलमान खान म्हटल कि दबंगिरी आपल्याला आठवते, मात्र सलमान खानने आणखी एक अनोखं काम करून दाखवलं आहे.

Updated: Jan 29, 2015, 09:29 PM IST
व्हिडिओ : सलमान खानने रंगवली आदिवासी वाडी title=

कर्जत : (रायगड) सलमान खान म्हटल कि दबंगिरी आपल्याला आठवते, मात्र सलमान खानने आणखी एक अनोखं काम करून दाखवलं आहे. हे काम करताना त्याने गुप्तता पाळली, मात्र अखेर जगासमोर हे कार्य आलं आहे . सलमान कधी काय करेल याच काही नेम नाही, आणि असाच काहीच सुखद अनुभव रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना आलाय . हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा नायक सलमान खान ने रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर तालुक्यातील हातनोली आदिवासी वाडीचा चेहरा मोहर बदलून टाकलाय . पाहा सलमाने गावातील घर रंगवली त्याचा व्हिडीओ

 

अलीकडे सलमान आपल्या चित्रपटच्या शुटींग साठी एनडी स्टुडीओमध्ये काही दिवस होता, त्यावेळी त्याचे सोबत करीना कपूर, हिमेश रेशमिया आदी मंडळी होती. आपल्या चित्रपटाचे शुटींग संपल्या नंतर सलमान खानने मुंबईहून ३० जणांचा एक ग्रुप बोलून स्वतः सलमान खानने हातनोली आदिवासीमधील ५० घरांना आपल्या हाताने कलरिंग करण्याचे सामाजिक काम केले. अवघ्या १ एका दिवसात आदिवासी वाडीतील सर्व घरांना वेगवेगळे कलर मारले . गावातील पाण्याची टाकी , वाचनालय, सामाजिक भवन , शौचालय सह गावातील घरांना सलमान आपल्या कुंचल्यातून रंग रंगोटी करण्याचे काम केले . यावेळी सलमान सोबत करीना , हिमेश हे देखील कलरिंग करण्याच्या कामात सहभागी झाले होते . हातनोली आदिवासी वाडीतील गावकरी सलमान बद्दल भरभरून बोलतात मात्र सलमान ने केलेल्या या कामाचे कौतुक गावकऱ्यांना आहे . या पूर्वी याच आदिवासीवाडीमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न होता. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी सलमानने गावकऱ्यांसाठी बोरवेल मारली आहे. हातनोली आदिवासी वाडीचा चेहरा मोहरा सलमानच्या रंग रंगोटीने पूर्ण पाने बदलून गेलाय. एका घराच्या भिंतीवर चक्क सलमाने ने गणपती रंगवलाय. हे काम करताना त्याने गावकर्यांना स्पष्ट सांगितले की हे काम मी केले हे कोणालाही सांगू नका, मला प्रसिद्धी नको आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.