पार्टी दूरच... सलमान अजून संजूला भेटलादेखील नाही!

भाईजान म्हणत स्वत:ला संजय दत्तचा खूप चांगला मित्र म्हणणारा सलमान खाननं तुरुंगातून बाहेर निघालेल्या मित्राची साधी चौकशीही केलेली नाही. हा संजयसाठीही मोठा धक्काच आहे. 

Updated: Mar 5, 2016, 05:05 PM IST
पार्टी दूरच... सलमान अजून संजूला भेटलादेखील नाही! title=

नवी दिल्ली : भाईजान म्हणत स्वत:ला संजय दत्तचा खूप चांगला मित्र म्हणणारा सलमान खाननं तुरुंगातून बाहेर निघालेल्या मित्राची साधी चौकशीही केलेली नाही. हा संजयसाठीही मोठा धक्काच आहे. 

काही दिवसांपूर्वीच भूतकाळ मागे टाकत शिक्षा पूर्ण करून बॉलिवूड अभिनेता संजय दत्त जेलमधून बाहेर आलाय. एव्हाना बॉलिवूडमधली अनेक मंडळी त्याला भेटून गेलेत. यामध्ये, अभिनेता शाहरुख खानचाही समावेश आहे. शाहरुखला भेटताना संजय भावूकही झाला होता. त्याचे डोळे भरून आले होते.

परंतु, संजय दत्तला भावाप्रमाणे मानतो असं सांगणारा सलमान खान मात्र अजूनही त्याच्या भेटीसाठी गेलेला नाही... याअगोदर, सलमान आणि त्याच्या कुटुंबानं आपल्या पनवेल स्थित फार्महाऊसवर संजयसाठी पार्टीचं आयोजन केल्याच्या बातम्या येत होत्या.

याचबद्दल विचारलं असता संजयनं 'मी तर केव्हापासून सलमान देणार असणाऱ्या पार्टीबद्दल ऐकतोय... पण, पार्टी सोड तो अजून मला भेटायलाही आलेला नाही' असं म्हणत संजयनं आपली नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली.