बिकिनी सीनसाठी आलियाला अशी घ्यावी लागली मेहनत...

आलिया भट्ट आपल्या आगामी चित्रपट 'शानदार'मध्ये आजवर प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे... या चित्रपटातून ती पहिल्यांदाच बिकनी परिधान करताना दिसणार आहे.

Updated: Aug 12, 2015, 02:46 PM IST
बिकिनी सीनसाठी आलियाला अशी घ्यावी लागली मेहनत...  title=

मुंबई : आलिया भट्ट आपल्या आगामी चित्रपट 'शानदार'मध्ये आजवर प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे... या चित्रपटातून ती पहिल्यांदाच बिकनी परिधान करताना दिसणार आहे.

आलियाच्या म्हणण्यानुसार, या सीनसाठी तिनं खूप मेहनत घेतलीय. या सीनमध्ये आपल्या शरीराल परफेक्ट शेपमध्ये आणण्यासाठी तिला आपल्या शरीरयष्टीवर मोठी मेहनत घ्यावी लागली. 

विकास बहल याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'शानदार' या सिनेमात आलिया भट्ट आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही आलिया गुलाबी रंगाच्या बिकिनीत दिसतेय. 

फिट राहण्यासाठी मी आणि शाहिदनं ट्रेनिंग घेतल्याचं सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान आलियानं म्हटलंय. शाहिदला तर फिट राहणं आवडतं त्यामुळे त्याचा काही प्रश्नच नव्हता. पण, मी मात्र बिकिनी शूटसाठी ट्रेनिंग घेत होते. यासाठी मला डाएटही करावं लागलं. फिट राहण्यावर भर द्यावा लागला. हा काही खूप मोठा सीन नव्हता पण मला मात्र त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली, असं आलियानं म्हटलंय. 

बिकिनी सीनचं शूट करताना मात्र सर्वात थंड दिवस निवडला गेला आणि शूट पूर्ण झाल्यानंतर लगेचच पँन्टस् चढवता येतील यासाठी आलिया तयारच होती, असं दिग्दर्शक विकास बहलनं यावेळी म्हटलंय. 

'शानदार' हा सिनेमा येत्या २२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.