सेक्स रॅकेटमध्ये सापडलेली श्वेता मिळाली बॉलीवूडमध्ये एन्ट्री

 नुकतीच सेक्स रॅकेटमध्ये पकडली गेली बॉलिवूड अभिनेत्री श्वेता प्रसाद बसू हिने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करणे सुरू केले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार श्वेता आता स्क्रिप्ट कन्सल्टंट म्हणून बॉलिवूडमध्ये आपले पुढचे पाऊल टाकत आहे. 

Updated: Dec 1, 2014, 09:37 PM IST
सेक्स रॅकेटमध्ये सापडलेली श्वेता मिळाली बॉलीवूडमध्ये एन्ट्री title=

मुंबई :  नुकतीच सेक्स रॅकेटमध्ये पकडली गेली बॉलिवूड अभिनेत्री श्वेता प्रसाद बसू हिने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करणे सुरू केले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार श्वेता आता स्क्रिप्ट कन्सल्टंट म्हणून बॉलिवूडमध्ये आपले पुढचे पाऊल टाकत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्वेता सेक्स रॅकेटमध्ये पकडल्यानंतर झालेल्या बदनामीनंतर हार मानली नाही. तिने या इंडस्ट्रीत पुन्हा एका जम बसविण्याचा निर्धार केलाआहे. बॉलिवूडमधील एक मोठे प्रोडक्शन हाऊससोबत श्वेता स्क्रिप्ट कन्सल्टंट काम करणार आहे. हे प्रोडक्शन हाऊस अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने आणि विकास बहर यांच्या पार्टनरशीपमध्ये काम करणार आहे. 

श्वेताने ही स्वीकार केले की मला या नव्या कामात आनंद मिळतो आहे. एक कलाकार म्हणून मला पुढे जाण्यास मदत होणार असल्याचे श्वेताने सांगितले. ती हंसल मेहता यांच्या चित्रपटात काम करणार असल्याच्या वृत्ताला तिने नकार दिला.  
श्वेता हिंदी चित्रपट ‘इकबाल’ आणि टीव्ही मालिका ‘कहानी घर घर की’ मध्ये आपल्याला दिसली होती. २००२मध्ये ‘मकडी’ चित्रपटात सर्वश्रेष्ठ बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.