सिनेमा : सिंग इज ब्लिंग
दिग्दर्शक : प्रभूदेवा
कलाकार : अक्षय कुमार, अॅमी जॅक्सन, लारा दत्ता, के के मेनन, रति अग्निहोत्री, कुणाल कपूर, योगराज सिंह
मुंबई : एखादा सिनेमा जाणूनबुजून कॉमेडी बनवण्याचा प्रयत्न केल्यावर जसा दिसतो... अगदी तसाच अक्षय कुमारचा 'सिंग इज ब्लिंग' दिसतोय.
सिनेमाचं कथानक आणि पटकथा ठिकठाक आहे... कॉमेडीला एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न यात करण्यात आलाय. या सिनेमाचा दिग्दर्शक आहे प्रभूदेवा आणि यात अक्षय कुमार, अॅमी जॅक्सन, लारा दत्ता, के के मेनन, रति अग्निहोत्री, कुणाल कपूर, योगराज सिंह (सॅबल चॅटर्जी) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
अक्षय कुमारची सहनिर्मिती असलेला हा सिनेमा बॉलिवूडच्या या 'खिलाडी'ला संपूर्णपणे आजमावण्याचा काही निवडक प्रयत्न करण्यात आलाय. पण, अक्षय कुमार मात्र आपल्या नेहमीच्याच म्हणजे जी मिळेल त्या भूमिकेचं सोनं करेल, अॅटिट्यूडमध्ये दिसतोय.
'सिंग इज ब्लिंग'मध्ये अक्षयनं उत्साहात या सिनेमाला चांगलं सादर करण्याचा प्रयत्न केलाय. सिनेमात दिसणार जोक्स आणि संवाद दखलपात्र आहेत, असं क्वचितच वाटतं. हा सिनेमा पंजाब, गोवा, रोमानिया अशा तीन स्थानांवर चित्रित करण्यात आलाय. सिनेमेटोग्राफर डूडलीनं या स्थानांवर धरतीपासून आकाशापर्यंत सुंदर पद्धतीनं चित्रिकरण केलंय. सिनेमात थोडा जरी अर्थ असता तर हे काम आणखीनंच सुंदर पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकलं असतं.
सिंग इज ब्लिंगचा नायक रफ्तार सिंह (अक्षय कुमार) पंजाबच्या एका गावात राहणारा युवक आहे. आपल्या मित्रांसोबत मिळून टवाळक्या करण्यात तो जास्त व्यस्त असतो. यामुळे, त्याला त्याच्या वडिलांच्या (योगराज सिंह) रागाचा पार चढलेला दिसतो. पण, नेहमीप्रमाणेच त्याची आई (रति अग्निहोत्री) त्याला वाचवते आणि मग तो एक प्राणीसंग्रहालयात नोकरीला लागतो. यावेळी, एक सिंह आपला पिंजरा तोडून तिथून पळून जातो... आणि मग, रफ्तार सिंह सिंहाच्या जागी एका कुत्र्याला पिंजऱ्यात धाडतो.
यामुळे, नाराज होत त्याचे पापाजी त्याला गोव्यातील एका कसिनोच्या मालकाकडे कामासाठी धाडतात. इथं तो आपल्या मालकाचा विश्वास जिंकतो. इथं त्याला एका इंग्रजी भाषिक मुलगी सारा राना (अॅमी जॅक्सन) हिला सांभाळण्याची जबाबदारी दिली जाते. सारा इथं रोमानियाहून आपल्या आईला सांभाळण्यासाठी आलीय... आता गोची अशी की रफ्तारला एकही शब्द इंग्रजीचा येत नाहीय... मग, त्याला आपल्या या पाहुण्याशी बातचीत करण्यासाठी एका अनुवादकाची (लारा दत्ता) मदत घ्यावी लागते. साराला कोणत्याही बॉडीगार्डची गरज नाहीय. कारण, ती एक फ्री स्टाईल फायटर आहे... जी भल्याभल्यांना पछाडू शकतेय.
अक्षय कुमारचे कट्टर फॅन्स त्याचा हा सिनेमाही मोठ्या आवडीनं पाहू शकतील. अॅक्शन आणि रोमान्समध्ये अक्षय खुलून जातो. जॅक्सन या संपूर्ण सिनेमात खूप चांगली दिसतेय. ती अॅक्शन सीन आणि रोमांटिक सीन्समध्ये एका अभिनेत्रीच्या रुपात आपली दखल घ्यायला भाग पाडते.
लाराचा विनोदी स्वभावही चांगलाच भावतो. पण, तिच्या भूमिकेला मात्र सिनेमात फार महत्त्व मिळालेलं दिसत नाही. या सिनेमात के के मेननदेखील आहे. मेनन याला चांगल्या भूमिकांसाठी ओळखलं जातं. तो या सिनेमात व्हिलनच्या भूमिकेत दिसतो... 'इजी इज बोरिंग' असं त्याचं या सिनेमातील घोषवाक्य... त्यामुळे, तो जे काही करतोय त्यामध्ये काही ना काह नाटकी पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.