सोनाक्षी सिन्हा सामील झाली गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये

 या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिवस मुंबईतील महिलांसाठी खास झाला, त्यांनी आपल्या नावावर 'गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड' आपल्या नावावर केला. याची साक्षीदार बनली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा... 

Bollywood Life | Updated: Mar 9, 2016, 06:58 PM IST
 सोनाक्षी सिन्हा सामील झाली गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये  title=

मुंबई :  या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिवस मुंबईतील महिलांसाठी खास झाला, त्यांनी आपल्या नावावर 'गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड' आपल्या नावावर केला. याची साक्षीदार बनली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा... 

मुंबईमध्ये ८ मार्च २०१६ रोजी या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात भारतीय महिलांनी सर्वाधिक संख्येने नेलपॉलिश लावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड  बनविला. या महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा होती. 

Sonakshi-Sinha-3-090316

 या महिलांनी एकाच वेळी १३२८ महिलांच्या नखांना नेल पॉलिश करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. तसेच त्यांना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या महिलांचे नाव नोंदविण्यात आले. 
 
 या पूर्वी २०११ मध्ये तायवानच्या नेल असोसिएशनने एका वेळी ११५६ महिलांच्या नखांना नेल पॉलिश लावण्याचा विक्रम केला होता. आता भारतीय महिलांनी १३२८ महिलांच्या नखांना एकाच वेळी नेल पॉलिश लावून तो विक्रम तोडला. भारतातील एका ब्युटी ब्रँडने या स्पर्धेचे आयोजन केले होते.